उन्हाळा
उन्हाळा
1 min
350
ऊन जास्त तापता
जमीनही तप्त होते
मध्येच पावसाचे थेंब पडता
मृदगंधाने मन तृप्त होते
ऊन कडक पडता
रानं पेट घेतात
हिरव्या वृक्षा खाली
मायेची सावली ते देतात
ऊन्हात काम करता
घामाच्या धारा वाहू लागतात
थंडगार पाणी पिता
मनाची तहान भागवतात
ऊन्हाची चाहूल लागता
गरमीने जीव व्याकूळ होतो
ओलाव्याची ऊब मिळता
पशू पक्षी आनंदी होवू लागतो
कडक ऊन्हाळा सरता
पाऊसाची चाहूल लागते
जमिनीत ओलावा धरता
धरतीमाता सुखावते
