जीवन
जीवन
जीवन म्हणजे काय असतं
जन्म मृत्यू याचं पुस्तक असतं
जन्म मिळाला म्हणून जीवन कसही उधाळायचं नसतं
आणि मृत्यू मिळाला म्हणून घाबरायचं नसतं
जीवन म्हणजे काय असतं
सुख दुःख याचं मिलन असतं
दुःख आलं म्हणून ते संपवायचं नसतं
आणि सुख आलं की कसही वागायचं नसतं
जीवन म्हणजे काय असतं
मित्र आणि शत्रू याचं नातं असतं
मित्राला कधी दुःख द्यायचं नसतं
आणि शत्रूला मात्र कधी जवळ करायचं नसतं
जीवन म्हणजे काय असतं
चांगले आणि वाईट याचं गुपित असतं
चांगले राहिल्याने कोणी नावं ठेवत नसतं
आणि वाईट वर्तणूक असल्याने कोणी जवळ येत नसतं
जीवन म्हणजे काय असतं
हार जीत यांची सांगड असतं
हार मिळाली म्हणून नाराज व्हायचं नसतं
आणि जीत मिळाली म्हणून कोणाला हिणवायचं नसतं
