STORYMIRROR

Govind Gorde

Others

4  

Govind Gorde

Others

ध्येय वेडा....

ध्येय वेडा....

1 min
599

जिद्द असेल । तरच उडणे ॥

मगच जिंकणे । शक्य होई ॥


चांगले कर्म कर । तयारीला लाग ॥

फुलेल सुंदर बाग । जीवनाची ॥


चंदनाप्रमाणे । देह झिजावा लागतो ॥

तेव्हा सुगंध मिळतो ॥ आयुष्याला ॥


निंदा करेल जग । हार मानू नको ॥

मागे फिरू नको । ध्येयासाठी ॥


मनी ठेव स्वप्न। ध्येय गाठण्याचे ॥

चीज होईल आयुष्याचे। तुझ्यासाठी ॥


कलेला जप । दाद मिळेल ॥

तुझी किंमत कळेल । जगामध्ये ॥


संयम बाळग । अपयश जाणार ॥

यश येणार । ध्येय गाठण्यासाठी ॥


चल ऊठ आता । ध्येयपुर्तीची आस धर ।। 

मनाची तयारी कर । संघर्षासाठी ।।


Rate this content
Log in