ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
33
ढग येतात, वीजा चमकतात, मोर नाचतात
वाटतरी किती पहावी पाऊस काही येतच नाही
शेतकरी होतात आतुर, निसर्ग धरतो सुर
वाटतरी किती पहावी पाऊस काही येतच नाही
शेतकऱ्यांच्या मनीची आस, शेतीचा झाला नास
वाटतरी किती पहावी पाऊस काही येतच नाही
आला तरी नसतं भान, करुन टाकतो घाण
वाटतरी किती पहावी पाऊस काही येतच नाही
शेतकऱ्यांनी घेतले कर्ज पोटासाठी, होऊन बसले कर्जबाजारी
वाट तरी किती पहावी पाऊस काही येतच नाही
