निसर्ग
निसर्ग
1 min
365
रूप तुझे सुंदर, वाणी तुझी मधूर
कोकीळीचे गाणे ऐकण्यास कान माझे आतुरले
भले मोठे रान, लागले माझे ध्यान
निसर्गाचे गुपित शोधण्यास पाय माझे भरकटले
उंच असा पिसारा, सुंदर असा मनोरा
मोराचे नाच बघण्यास डोळे माझे बहरले
पसरलेली उंच झाडी, त्यात लपलेली सुंदर झोपडी
सावलीचे भाग्य नशीबी माझ्या आले
पक्ष्यांचा सुंदर थवा, चविष्ट असा रानमेवा
डोंगराच्या कुशीत फिरणास मन माझे गहिवरले
खळखळ वाजणारे पाणी, पक्षांचे नवनवीन गाणी
पर्यावरणाचे आभार मानण्यास जमिनीवर मस्तक माझे टेकवले
