आपला समाज
आपला समाज


आपण कसे वागावे आणि कसे वागू नये
आपण कसे बोलावे आणि कसे बोलू नये
आपण काय करावे आणि कय करु नये
हे जो ठरवतो तो असतो आपला समाज
आपण कसे आहोत आणि कसे नाही
आपण जीवन कसे जगावे आणि कसे जगू नाही
आपण कसे राहावे आणि कसे राहू नाही
हे जो ठरवतो तो असतो आपला समाज
आपण जन्माला आल्यापासून आपल्या मरणापर्यंत
आपल्या आयुष्यातील सुरुवातीपासून आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत
आपण शिकत असल्यापासून आपल्या अनुभवापर्यंत
जो सोबत असतो तो असतो आपला समाज
आपल्या जीवनाला ज्याच्यामुळे वेगळीच कलाटणी मिळते
आपल्या सुख-दु:खाची जाणीव ज्याच्यामुळे होत असते
आपल्याला कोण काय म्हणेल असे ज्याच्यामुळे वाटते
हे ज्याच्यामुळे घडते तो असतो आपला समाज
एखाद्याचे चांगले किंवा वाईट जो ठरवतो
आपल्या अस्तित्वाची जाणीव जो करुन देतो
आपल्या आयुष्याला जो शेवटपर्यंत पुरतो
तो फक्त आणि फक्त असतो आपला समाज