माझी कविता
माझी कविता
1 min
66
ओठांवर शब्द येता
फुलू लागते कविता
रसिकांची दाद मिळता
सुचू लागते कविता
कानावर शब्द पडता
लिहू वाटते कविता
जीव व्याकूळ होता
उमटू लागते कविता
वाचताना शब्द सापडता
करावी वाटते कविता
काळजाला भिडणारे वाक्य भेटता
होवू लागते कविता
बोलताना शब्द सुचता
तयार होते कविता
मनाला स्पर्श करता
सादर होते कविता
मनावर शब्द ताबा घेता
उंचावरती असते कविता
मैफिलीत सादर करता
ओठांवरती नाचू लागते कविता
