STORYMIRROR

Monali Kirane

Tragedy

3  

Monali Kirane

Tragedy

माणूस फक्त म्हणा

माणूस फक्त म्हणा

1 min
182

नको फुकाचा मानमरातब,नको उगी देवपणा

सहनशील या कळसुत्रीला माणूस फक्त म्हणा.

अबला म्हणता-बाजू सारता,परि माता सोशी प्रसव वेणा

वेळी भेदते असूर भूवरी- तरी माणूस फक्त म्हणा.

जन्मभराचा चाकरमानी,स्तुतीचा शब्द त्यांसी विरळा

ना पैशाचा मोबदला, राहो अस्तित्वाच्या खुणा.

वेळी ओढते पांगुळगाडा, घरचा वा देशाचा

उदर भरण करी या विश्वाचे,माणूस फक्त म्हणा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy