माणुसकी
माणुसकी
लेखणी माझी कायम हातात
विचार चालती सतत डोक्यात
खोटेपणा दांभिकपणा फोडावा वाटतं
विचारांचं थैमान सुरूच राहतं
चांगलं असं कोणीच नाही
फसवा फसवी चालूच राही
हाती लागताच सोडत नाहीत
चुना लावत सापडत नाहीत
आत्ताच तुमची आठवण काढली
आव आणून मिश्किल हसली
दुरून डोंगर अति साजरे
हलक्या कानाचे कान भरे
किती दिवस असं चालेल
माणसातील माणुसकी लगेच संपेल
