मानलेला भाऊ
मानलेला भाऊ
भाऊ माझा मानलेला शुभम
प्रत्येक गोष्टीचं माझ्या साठी solution
असो कितीही दुःख तो मला म्हणतो
काळजी नको करू मी आहे तोपर्यंत
किती साधं आणि सरळ आहे ना दादा आपल नात
जिथे मी काही न बोलताच तुला सर्व समजल्या जात
जगाहून वेगळा त्याचा माझ्यासाठीचा जिव्हाळा...||ध्रु||
नात आमचं सख्ख नाही
पण सख्ख्या हून पक्कं होवून गेलं
भाऊ हा रक्ताचा असावा असं काही नसत
मानलेल्या भावाच नात सुद्धा भारीच असत
प्रत्येक नाती रक्ताची नसतात,
काही नाती मनाने मानलेली असतात
जगाहून वेगळा त्याचा माझ्यासाठीचा जिव्हाळा||१|
भाऊ माझा शुभम लयभारी
सर्वांना सांगतो बहिण माझी मनू न्यारी
असो कुठली ही गोष्ट आधी मी
त्याला आणि तो मलाच सांगतो
नात कस टिकवायचं हे फ्कत
माझ्या शुभम दादालाच जमत
जगाहून वेगळा त्याचा माझ्यासाठीचा जिव्हाळा..||२||.
मी स्वभावाने रागीट आणि अल्लळ
माझा दादा समजदार आणि सरळ
ज्या नात्यात कुठलाही स्वार्थ नसत
तेच तर नात बहिण भावाच असत
जस आईच जागा बहिणीच घेते
तसचं बाबाच रूप माझ्या दादाने घेतल
जगाहून वेगळा त्याचा माझ्यासाठीचा जिव्हाळा||३||
