मामा...!
मामा...!
तिच्या कानात दिसता डूल
ओळखून घेतलं कडेवर मूल
बाप पिऊन टाईट फूल
माझी दांडीच झाली गुल
प्रेमाचा परिपाक
म्हणजे मामाची उत्पत्ती
काय करायची असून
बापाची अलोट संपत्ती
ती हृदय इथेच टाकून गेली
जनता तुडवून त्यावरून पळाली
मला खरेच भोवळ आली
बारीकशी जखम अंतरास झाली
भळभळणारी जखम ती
आजही वाहतेच आहे
मामाचे हृदय घेऊन
ती जखम मिरवतेच आहे
कटाक्ष तिचा बस स्टँडवर
घाव घालून पार गेला
मामाचा अभ्येद्य किल्लाही
भुई सपाट क्षणात झाला...!
