STORYMIRROR

jaya munde

Tragedy

3  

jaya munde

Tragedy

असा अवकाळी पाऊस

असा अवकाळी पाऊस

1 min
275

गर्जत, कडकडत आला कसा

आगंतुक अवकाळी पाऊस,

विचार न केला त्याने कसा

रानोरानी लावून फूस........


मोत्यावानी शिवार सजलं

डौल लय झोकात होता,

काळी आई हसताना पाहून

बळी माझा सुखात होता.....


गहू, ज्वारी, हरभरा रानी उभा

भरघोस मोती पोटी घेऊन,

मनोमनी हिशोब लावायला

लाखांवर उत्पन्न येऊन.......


कष्टाला यश आलेलं कौतुकाने

रोज-रोज बळी पहायचा,

लक्ष्मीचा हिशोब मग

मनोमनी लावायचा.....


निसर्गाला नाही पाहवली

सुखाची त्याची कक्षा,

असा अवकाळी पाऊस 

घेतो बळीची परीक्षा....


एका रात्रीत कोसळून त्याने

होत्याचं नव्हतं केलं,

जमीनदोस्त पीक पाहुनी

डोळा पाणी आलं.....

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy