STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

आयुष्य

आयुष्य

1 min
233

आयुष्य-आयुष्य म्हणजे

नक्की असतं तरी काय?

नाकातला श्वास आणि

हृदयातील धडधड

हे बंद पडलं की,

संपलं सारं खरं तर


इथं राजा वा रंक

असं काही नसतं,

शेवटच्या प्रवासाला

बांबूची ताटी आणि

चार खांदेकरी

हेच एकमात्र जाण्याचं

साधन असतं


आयुष्यभर खस्ता

खाल्लेले आपण

तेव्हा फार शांत असतो

पण; आपल्याला भेटायला

आलेल्या बऱ्याच जणांच्या

डोळ्यात आपल्यासाठी

पाणी आणि आक्रोश

असतो अन; आपल्या शरीरात

तेव्हा मात्र प्राण नसतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy