Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mrs. Mangla Borkar

Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy

जीवनात नाती

जीवनात नाती

1 min
302


जीवनात नाती तशी अनेकच असतात,

पण ती जपणारी लोक फार कमीच असतात....|

काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची....|


काही नाती असतात जन्मो-जन्मीची,

तर काही.... काही क्षणापूरतीची....|


काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी,

पण वेळ आलीच तर वाकणारी....|


काही नाती असतात, लांबूनच आपले म्हणणारी,

जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी....|


काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी,

तर काही प्रेमाने आपलेसे करणारी....|


काही नाती असतात, न जोडतासुद्धा टिकणारी,

तर काही जोडूनसुद्धा तुटणारी ....|  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy