सुखाची उसनवारी
सुखाची उसनवारी
कितीही उसनवारी केली सुखाची
तरी दुःख काही ते पुरु देत नाही.
दोन वेळच्या पोटाच्या भुके पाई
समाधानाची झोप कधी लागू देत नाही.
किती करावी गुलामगिरी याची
किती करावी मनधरणी
शेवटी ठरले पळकूटे सुख ते
पाऊल खुना ही कधी मागे ठेऊ देत नाही.
टीच भर पोटाची भुक आयुष्याशी पैज लावते
अन् शेवटच्या श्वासापर्यन्त मगे पळवते
धर्म कुठला हि असला तरी ती
कधीही कुणाला जिंकू देत नाही.
दुःख चिटकले आयुष्याला
जनु जात गोचिड़ाची असे,
किती ही पिले रक्त तरीही
कधी भूक त्याची भागू देत नाही।।
सुख दु:ख एका तराजुत,
सम होऊ शकत नाही,
कितीही सुखाच्या पारडयात सुख टाकले तरी ही
दुःखाचे पारड़े कधी ते वर येऊ देत नाही
