STORYMIRROR

Arun Gode

Tragedy

3  

Arun Gode

Tragedy

किसान जनांदोलन

किसान जनांदोलन

1 min
227

शेतकरी, रोजंदाराने गाठले संघर्षाचे मैदान,

जेव्हा आणले ग्रामीण अर्थचक्र विरोधी कृषिकानून.

नवीन कृषिकानुन विरोधात दिल्लीत मांडले ठान,

शेतकऱ्याने लावली पनाला आन-बान-शान.

शंभराहुन अधिक शेतकऱ्याचे गेले प्राण,

विश्र्वातील सर्वात मोठ्या आंदोलनाचा मिळाला मान.

आंतकवादी, नक्षलवादी पाकिस्तानीचा मिळाला सम्मान,

अन्नदाताचा सरकार ने केला आहे घोर अपमान.

ट्रैक्टर रैली ने कमी होणार देशाची शान,

गणतंत्र परेड साठी सरकारने पणाला लावले प्राण.

शेतकरी आंदोलना वर लावले बदनामीचे लांछन,

शांतीभंगाचे सरकारी यंत्रने ने रचले स्वयम कारस्थान.

कॉर्पोरेट घराणे भरभराटीचा हा सरकारी अभियान,

शेतकऱ्याने उचलला विडा रद्द करविणार कृषिकानून.

शेतकऱ्या पाहिजे सरकारी किमान मूल्य फसल प्रणाली,

मगच मागे घेणार शेतकरी आंदोलन, व होणार घर वापसी.

असे-कसे असू शकते लोकशाही सरकारी कठोर शासन,

शेतकऱ्यावर चालवल्या गोळ्या, अश्रूधूर व लाठी मारहाण.

शेतकऱ्याला नको आहे कृषिसुधार सरकारी कानून,

तरी सरकार का लागू करते शेतीविरोधी धोरण?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy