STORYMIRROR

Vishal Puntambekar

Tragedy

3  

Vishal Puntambekar

Tragedy

माझ्यानंतर

माझ्यानंतर

1 min
113

काय आनंदाची बातमी, जाता जाता

सद्गती मिळेल माझ्या आत्मास आता

आयुष्याचा तुझ्याबरोबरचा हरेक क्षण

साजरा केला उत्साहाने, मानुन सण


 तुझे ते स्मित हास्य अतिविलक्षण 

पाहुन प्रफ्फुल्लित होते माझे मन

तुझ्या आनंदापुढे शुल्लक काहीपण

तुला अर्पण माझे तन, मन अणि धन


तुझ्या मार्गात नको माझा काटा

मी नसलो तर मोकळ्या तुला वाटा

आयुष्यात किती येवो संकट लाटा

शुभेच्छा ह्या कि तव आनंदा नसावा तोटा 


निशब्द होताना शेवटची एकच विनंती

कायम लोभ असावा माझियावरती

कधीही ढळु नये, तुझी मजवर प्रिती

शारिरीक रुपात जरी नसेल सोबती


आठवणींची आपल्या नको विस्मृती

उत्तरोत्तर होत राहे तुझ्या आयुष्यात प्रगती

आसमंतात चहुकडे तुझी होणारी किर्ती 

बघणार गौप्यरुपाने राहुन धरतीवरती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy