STORYMIRROR

Rucha Rucha

Abstract Tragedy

4  

Rucha Rucha

Abstract Tragedy

माझ्या स्वप्नातील भारत

माझ्या स्वप्नातील भारत

1 min
9.8K

माझ्या स्वप्नातील भारत

आहे तरी कसा?

सुजलाम सुफलाम म्हणतो आपण

आहे अगदी तसा ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

आहेत विविध धर्म जाती

हिंदू-मुस्लिम अन्य जन

तेथे एकोप्याने नांदती ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

प्रत्येक नागरिक आहे शिकलेला

शिक्षणामुळे प्रत्येक घरात

ज्ञानाचा प्रकाश आहे पसरलेला ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

दिसणार नाही कुठेही भ्रष्टाचार

"देशाची उन्नती हीच स्वतःची"

हीच धारणा झालीय साऱ्यांची ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

नाही दिसणार दुष्काळ

शेतकऱ्याच्या आयुष्यातही दिसेल

बहरलेला नवा सुकाळ ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

बळीराजा सुखाने नांदतो

शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या गोष्टी

आम्ही आता पुराणांत मांडतो ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

प्रत्येक व्यक्ती पुरातन वास्तूंचे संवर्धन करतात

राज्याच्या,देशाचे वैभव असलेल्या गड किल्ले नद्यांची

स्वछता नेटकेपणाने राखतात ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

पाहायला मिळतील सुसंस्कार

याच संस्कारामुळे दिसतोय

नव्या बदलांचा हा चमत्कार ।।


माझ्या स्वप्नातील भारतात

बलात्कारा सारख्या गोष्टी घडत नाहीत

परस्त्री मातेसमान ही शिकवणूक

कोणीही येथे विसरत नाही ।।।

  



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract