STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

3  

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

माझ्या मनातील स्वातंत्र्यदिन

माझ्या मनातील स्वातंत्र्यदिन

1 min
287

दिवाळी दसऱ्यापेक्षाही महान

वाटतो मला स्वातंत्र्याचा सण

असंख्य वीरांनी केले बलिदान

नेत्रांनी पाहिला आजचा हा दिन 


या सणाला नसतो 

लाडू पेढा शेव चिवडा

समोर झळकतो

स्वातंत्र्याचा तिरंगा झेंडा


नाही होत या सणाला 

लक्ष्मी मातेचे पूजन

राष्ट्रगीत म्हणुुनी 

करितो भारत मातेचे वंदन 


नाही वाजत या सणााला

सुरसुरी फुलझाडे फटाके

वाजती स्वातंत्र्याची स्फूर्ती गीते

ऐकून मनाला बसती चटके


नाही भेटत या सणाला

रक्ताची नाती गोती

आपोआपच जमा होतात

माणुसकीच्या भेटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational