❤️ माझं प्रेम..
❤️ माझं प्रेम..
माझं प्रेम सदैव तुझ्या सोबत असतं
जिथे जाशील तिथे ते वावरत असतं
रात्री झोपलास तर स्वप्नांत असतं
पावसात गेलास तर थेंबात असतं
थंडी त गेलास तर गारठयात दिसतं
हसलास तर तुझ्या गालात दिसतं
रडलास तर तुझ्या डोळ्यांत दिसतं
विचार करताना विचारांत असतं
जिथे जाशील तिथे ते वावरत असतं
दूर गेलास तरी आठवणीत असतं
गाणं ऐकल स तर गाण्यात असतं
आरशात पाहिलं स तर आरशात दिसतं
जिथे जाशील तिथे माझं प्रेम तुझ्या सोबतच असतं
भांडण झाल्यावर तुझ्या मौनात असतं
रात्र झाली की चंद्रात दिसतं
झोप येत नसली की स्वप्नांत दिसतं
जिथे जाशील तिथे माझं प्रेम तुझ्या सोबतच असतं
दूर जाताच अश्रू त असतं
सात जन्माच्या बंधनात असतं
अरे वेड्या तू एकटा कधीच नसतोस
मी शरीराने दूर असते पण मनाने मी तुझ्या सोबत च असते
जिथे जावं तिथे मी तुझ्या सोबत च वावरत असते

