असाच एक दिवस
असाच एक दिवस
असाच एक दिवस असावा
त्यात तुझं रूप दिसावं
तु स्वप्नासारखा माझ्या समोर असावं
आणि मी तुझ्या जवळ बसावं
असाच एक दिवस असावा
तु हसत राहावंसं सदा आणि त्या हसण्याच कारण मी असावं
मी हाका माराव्या प्रेमाच्या
आणि उत्तर तुझ्या आवाजाचे असावे
असाच एक दिवस असावा
त्यात तुझं रूप दिसावं
तु सूंदर माझा पती दिसावा
आणि मी तुझी पत्नी असावी
असाच एक दिवस असावा
त्यात तुझं रूप दिसाव
मी मरणाच्या दारावर असावं
आणि तु अलगद मला मिठीत घ्यावं

