तुझी आठवण...❤️
तुझी आठवण...❤️
तू म्हणतोस ना ,माझी आठवण कधी येते तुला
अरे नाहीच येत तुझी आठवण मला...
आठवण तर त्यांना ज्यांना विसरायची भीती वाटते...
आणि तू तर सतत माझ्या सोबत च असतोस की,
तुला वाटत असेल की ,
हे कसं शक्य आहे?
"तर ऐक आता "
मी लिहीत असताना सतत माझ्या शब्दात असतोस...
मी बोलत असताना माझ्या विचारांत असतोस....
मी गर्दीत असताना अचानक तिथेही येऊन माझा हात धरतोस घाबरु नकोस
" मी आहे ना" बोलतोस...
अरे इतकं च काय तर मी अंधाराला घाबरते म्हणून
तू मला मिठीत घेतोस आणि म्हणतोस घाबरु नकोस
"मी आहे ना"
कधी कधी त्या फुलांन मधे पण मला च दिसतोस....
आणि गुलाब हसून म्हणतो
तू छान दिसतेस त्या गुलाबात ही तूच दिसतोस...
कधी कधी पाणी पिताना मला ठसका लागताच अग जरा सावकाश म्हणून कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवतोस....
कधी समुद्र किनाऱ्यावर वर उदास होऊन डोळ्यातून अश्रू वहात असताना, एखादी लाठ मला चिंब भिजवून जाते
आणि म्हणतोस ,तुला माहिती आहे ना तुझ्या डोळ्यात अश्रू नाही फक्त मीच दिसायला हव,
त्या लाठेत पण तूच असतोस...
चक्क स्व्यपक करताना ही माझ्या बाजूला येऊन उभा राहतोस ....
आणि बघतेस काय
मला आवडतय ना मग तू तेच केलस ना मग छान च झालं असेल असं च म्हणतोस...
अजून तुला किती आणि कस सांगू
अरे वेड्या तू माझं आता अस्तिव बनलायस...
खरच रे ह्या सृष्टी च्या एका एका कणात तूच वसलायस...
मी आता माझी कुठे राहिले रे
मी कधीच तुझी झाले
तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं अनोखं जग मी रचलंय..
तिथेच आपल्या दोन जीवांचा सुंदर संसार मी मांडलाय...

