कधी पासून
कधी पासून
कधीपासून पाहतेय
किती कासावीस झालांयस
वाऱ्याशी भांडलायस का?
सावल्या पासून लपलायंस
दमलायस खुप ...
पावसांनी फसवलय का?
उन्हाने ओरबाडलय का?
ये आता माझ्या पाशी..!
खांद्या वरती डोकं ठेव...
स्पर्शाच पांघरून, मायेची ऊब, ओठाचं मलम,आणि
मिठीतलं प्रेम देते मी तुला...!
मी इतके दिवस कुठे होते..!
आहे रे मी राजा इथेच...
इथेच आहे ,इथेच असणार आहे...
बरा झालायस का तू?
बघ किती त्रासलायस ..!
जाशील लगेच कामावर
ठाऊक आहे मला ,
जरा तर तुझ्या वरती प्रेम करू दे रे मला...
मी तुला सोडून कुठे जाणार माझ्या राजा,
तूझ्या साठी कायमची इथे च
थांबणार आहे ..!!

