माझं जीवन जगून जा
माझं जीवन जगून जा
तू ये आणि माझ्या
वेदना बघून जा
दोन क्षण का होईना
माझं जीवन जगून जा || 0 ||
बघ जरा मी कसा
जगतोय तुझ्याविना
जग कसं दुःखात मी
बघतोय तुझ्याविना
रंगात माझ्या प्रेमाच्या
तुही रंगून जा
दोन क्षण का होईना
माझं जीवन जगून जा || 1 ||