STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2.5  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

माझी तुळजाभवानी आई

माझी तुळजाभवानी आई

1 min
17.1K



माझी तुळजा भवानी आई

साऱ्या भक्त जनांची माई

महाराष्ट्राची छत्र साऊली

जय तुळजाभवानीमाऊली


उस्मानाबाद जिल्हयात

तुळजापुर तालुक्यात

वसली तुळजापुर शहरात

पवित्र जागेच्या मातीत


प्रसिद्ध आहे तीर्थस्थान

येती सारे भक्त जन

दर्शन घेती श्रद्धा ठेऊन

पाप जाते सारे धुऊन


संबळ वाजतो तालात

आराधी गातात सुरात

घालूनी कवडयाच्या माळी

कुंकू लाविती कपाळी


महिमा गातात अपरंपार

आई सत्त्वाची खरी थोर

करते विघ्नांचा संहार

भक्तानां घडतो चमत्कार


शिवछत्रपतींची रक्षणदायी

महाराजांची जीवनभर माई

दिले बळ त्यांच्या कार्याला

विघ्नांचा संहार करण्याला


संचार देवीचा अंगात

यश जागोजागी कार्यात

अगाध महिमा देवीचा थोर

भक्त गातात भारतभर


ऐतिहासिक वास्तूचे स्थान

जपले मोठ्या भक्तीभावान

लाभला महाराष्ट्राला बहुमान

पिढ्या, पिढ्यांनी केले जतन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational