माझी शब्दफुले
माझी शब्दफुले
माझी शब्दफुले....
अनमोल ठेवा,
कौतुक मिश्रित
असा त्यांचा हेवा !......१
एकेक अक्षर....
संस्कृतीचा मेळ,
कवितेचा आत्मा
भावनांचा खेळ !........२
विहरता मन....
गुंफतात ओळी,
नकळत जन्मे
काव्य, कथा मोळी !......३
साहित्य पर्वणी....
समृद्ध गुणांची,
माझी शब्दफुले
ओंजळ सुखांची !........४
फुंकर होतात.....
कधी वेदनांची,
साथ देती कधी
हळव्या क्षणांची !........५
कष्टप्रद काळी.....
हेच ते सोबती,
सामर्थ्याची नांदी
यांच्याच संगती !.........६
देई यश, कीर्ती.....
किती करू भक्ती,
लाभली ही मज
सर्वोत्कृष्ट शक्ती !........७
