STORYMIRROR

Rohini Gandhewar

Inspirational

3  

Rohini Gandhewar

Inspirational

माझी शाळा

माझी शाळा

1 min
182

माझी शाळा होती घराजवळ

कधीच केली नाही पळापळ

माझ्या शाळेचे, वाऱ्याच्या वेगाने गेले ते दिवस

आठवणी च्या कप्प्यात मात्र साठवून ठेवले ते दिवस!....


"सुसंगती सदा घडो "ने सुरवात शाळेची

"आता विश्वात्मके "ने सांगता शेवटच्या तासाची

मधल्या सुट्टीतील धमाल बटाटा पोळीची

लस टोचनारे आले की, खिडकीतून धूम ठोकण्याची....


स्टेज वरील गाण्याच्या रोज तालमिने मिळे शाळेस नामांकन 

बाजाच्या पेटीवर, बोटांची सर्कस करी, सर महाजन

सुंदर आमच्या सीताबाई संगई शाळेची वाटचाल

 अन् उत्कृष्ट असे दरवर्षीचा निकाल...


लेझिम टिपर्यांची गंमत, खो खो, थ्रो बॉल ची जम्मत

बक्षीस मिळण्याची तर औरच असे रंगत

ग्रंथालयातील पुस्तकांची करामत

सर्व काही असे हृदयाशी संमत...


प्रत्येक सर शिकवीत जीव तोडून

डोळा आले पाणी, जेव्हा गेले शाळा सोडून ..

प्रत्येक सरांना दिले आम्ही एक उपनाव

आमच्या वर्गाचे ' होते अभ्यासू मात्र नाव....


लेझिम, टिपऱ्या , गाणं यात असे नंबर 

खेळ टुर्नामेंट मधे खोचत असू कंबर

शिस्त मोठी, अभ्यास तासांची

रेलचेल असे सुंदर कार्यक्रमाची...


खेळ, संगीत, अभ्यास, योग्य संस्कार

केले आम्हावर आमच्या शाळेने

दर्जा उंचावत आहे शाळेचा

अगदी उत्कृष्ट निकालाने...


मैत्रिणींचा चाले कधी गप्पांचा पिरेड

हेडसर येताच, होई मग आमची परेड

सर्वांचे अट्टहास वरच्या नंबर साठी

हस्ताक्षर अन् गृहपाठाचे गुण माझ्या गाठी....


अजूनही पुसत नाही ते रमणीय दिवस

वाटते लहान होऊन वर्गात बसून यावेच एकदिवस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational