अभंग
अभंग
1 min
134
पाऊले चालती/पंढरीची वाट/
माया मोठी दाट/भक्तांची हो//१//
टाळ नी चिपळ्या/संगे मृदंगाचा/नाद भजनाचा/मुखी नाम//२//
ओढ ती भेटीची/सर्व त्या भक्तांना/आसू नयनांना/आनंदाचे//३//
अनवाणी पाय/डोई वृंदावन/खेळाया रिंगण/मौज मस्ती//४//
दिन जाती कसे/ना कळे भक्तांना/आषाढी दर्शना/
आतुरची//५//
आली एकादशी/पाय स्थिरावले/पांग ते फिटले/पाहूनिया//६//
आनंद मावेना/टेकुनिया माथा/सोडवेना गाथा/गाऊनिया//७//
स्वर्ग सुख मिळे/विठू दर्शनाने/
वारी साफल्याने/समाधान//८//
पाऊल ना थके/ना लागे पाऊस/
श्रध्देची ही हौस/छबी म्हणे//९//