श्रावण सरी
श्रावण सरी
1 min
310
हसरा नाचरा
श्रावण आला
उन्हात अंगणी
पाऊस झाला
ढगांचा मंडप
आकाशी लागला
इंद्रधनुष्य रंगीत
सूर्याने पाहिला
हिरव्या झाडांना
कळींचा बहर
अधिक मासात
श्रावणाची लहर
पुरुषोत्तम मासाला
श्रावणाचा साज
चैतन्यमयी श्रावण
वाटतो मला आज
सणांची रेलचेल
उत्साह द्विगुणित
बेल, तुळशी, फुलांना
महत्व समायोचित