श्रावण सरी
श्रावण सरी
1 min
114
आला श्रावण
मेघा घेऊन
श्रावण सरी
पुण्य पावन
इंद्रधनूचे
सप्त रंगन
नभी अवनी
जोडे संधान
दृश्य देखणे
लोभस वाणे
उन पाऊस
ईश कृपेने
हिरवाळीची
वेगळी धुंदी
बकुळ फुले
श्वासात बांधी
सोमवारला
शिव पूजन
तीन वर्षांनी
निज श्रावण
मनी श्रावण
श्रावण ध्यानी
श्रावण शुद्ध
फळो पूजनी