STORYMIRROR

Rohini Gandhewar

Others

3  

Rohini Gandhewar

Others

राहून गेले

राहून गेले

1 min
132

बाबा तुम्हाला सांगायचे होते

जमायला लागली कविता मला

तुमच्या प्रिय "हॉकी स्टिकलाच"

सांगून टाकले, जी कळवेल तुम्हाला


काव्य निनाद सारख्या अनेक

समूहान्नी शिकविले मज, बरेच

ज्याचा तुम्ही पाया घडवला

तुम्ही असतांना, माझा खरेच


तुमची नाट्य, नृत्य, लेखन दिग्दर्शन

कामी आले मज आयुष्यात

आज मिळते पूर्ण समाधान

ठायी ठायी माझ्या जीवनात


मंगलाष्टकातील अलंकारीक शब्द

नाही तुमच्यासारखे उच्चकोटीचे जमत

थोडासाच वसा जपला तुमचा 

नाही असे त्यात काही दुमत


आदर्श गुरुजी सर्वश्रुत तुम्ही

कोणत्याही विषयावर असख्लीत 

राहून गेले विचारायचे तुम्हा

अभ्यासातील खरी मर्म बातचीत


हिम्मतच नव्हती बोलण्याची

पत्रोत्तरातून काय ते मनोगत!

राहून गेले मोकळे बोलणे

केली मीच स्वतःची फसगत


पानबुड्याचा खजिना तुमचा

साहित्य वाचनाचा महामेरू

त्याचाच फायदा झाला मला

मुलांनाही ठरला तो कल्पतरू


आठवणीत तुम्ही, नि आई

आता पुन्हा भेटणे नाही

राहून गेले सांगायचे तुम्हा

उत्कर्षांचे क्षण माझे काही


Rate this content
Log in