अबोल प्रीत
अबोल प्रीत
1 min
142
तुझ्या स्पर्शात मोहरली
अबोल प्रीत बहरली||ध्रु||
पौर्णिमा चांदराती अशी
व्हावी पहिली भेट खुशी
जादुई स्पर्शात मी न्हाली
अबोल प्रीत बहरली||१||
मंदसा गारवा हवासा
ओढीचा हट्ट जरासा
नजरेतून मखमली
अबोल प्रीत बहरली||२||
मुक्या भावनांने खेळलो
किती भावूक गहिवरलो
शिरपेची जन्मगाठ बांधली
अबोल प्रीत बहरली||३||