मराठीचीये बोलू कौतुके
मराठीचीये बोलू कौतुके
ठ...🌹 ठसठशीत कुंकू ल्यालेली
ड...🌹 डवरून फुलली जगती
ढ...🪵ढोल वाजवून गौरवू
ण...(स्वर)🙏🏻अभिमानाने राजभाषा म्हणती..१
म...👍 माझी मराठी भाषा
य... 🙏🏻यावतचंद्रदिवाकरो अशी आहे
र...❄️रूपवती नक्षीदार अक्षरांची
ल...😌लवचिक लाजाळू आहे...२
व...👌वृत अलंकारांनी सुशोभित
श...🦚शब्दांची कलाकुसर तिच्यात
ष(स्वर)... 📚अमूल्य साहित्य ग्रंथांनी सामावलेली
स...🖋️सांस्कृतिक दर्जेदारपणा वारस्यात...३
ह...🎀हुकुमी एक्का मराठी
ळ (स्वर)...🪜 उत्तुंग झेप तिची
क्ष... 🙏🏻क्षमा, शांती, नम्रता
ज्ञ...😇 ज्ञानवर्धिनी मराठी आवडीची...४
(मनोरम शब्दावली नियम.. क पासुन ज्ञ पर्यंत वर्ण... रचना करताना अनुक्रमें असावे.. एका चार ओळीच्या कडव्यासाठी, चार वर्ण अनुक्रमे...जसे क, ख, ग, घ.....तसेच ड;, ञ, ण, ष, आणि ळ.... हे पाच वर्ण ,रचना करताना अनुक्रमे आल्यास... त्या वर्णाच्या ठिकाणीं, अ पासुन अ: पर्यंत कोणताही एक"स्वर "सुरवातीस वापरून ओळ पुढे सुरू ठेवणे. तसेच एका ओळीत तीन शब्द असावे.. हे बंधन आहे)
