STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

माझी मराठी

माझी मराठी

1 min
181

माझ्या मराठीची गोडी 

नाही कोणत्याही भाषेत 

तिचा अगाध महीमा 

तिच्या रसाळ वाणीत 


माझ्या मराठीची गोडी 

संत, कवींच्या शब्दांत 

अंधारातून नेई प्रकाशाकडे 

सामर्थ्य तिच्या प्रबोधनात 


माझ्या मराठीची गोडी 

लागे सर्व प्राणी,पक्षांना 

तिच्याच भाषेत गातात 

आनंद देई माणसाना 


माझ्या मराठीची गोडी 

मराठी मनाची हाक 

तिच्या सोबतीने ऐकतो 

राजभाषेचे कोडकौतुक 


माझ्या मराठीची गोडी 

मराठी रसिकांची माय 

तिच्या अगाध ज्ञानाचा 

सर्व विश्वात विजय 


माझ्या मराठीची गोडी 

साऱ्या विश्वाला आवडते 

तिच्या मधूर भाषेने  

सर्व जगाला जिंकते 


माझ्या मराठीची गोडी 

नाते जोडले रक्ताचे  

तिच्या शब्दांत स्फुरते 

क्रांती विचार, देशाचे  


माझ्या मराठीची गोडी 

हक्क तिच्या प्रतिष्ठेचा 

रक्षण करू या सारे 

तिच्या कायम अस्मितेचा 


माझ्या मराठीची गोडी 

आपण सारी लेकरे 

तिच्या अखंड ठेवण्यास 

येऊ मराठी जन सारे


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational