माझी कविता
माझी कविता
कविता अनेक लिहीतील कवी
तरीही माझी कविता नवी,
असते वेगळी इतरांहुनी
प्रत्येक क्षेत्रात जीवनाच्या
जीवना सारखीच माझ्या,
केवळ शब्दखेळ नव्हे हा
आवाज असतो अंतरीचा
अनुभवाचा, जीवनातल्या सुख दुःखाचा
त्यामुळेच वेगळी माझी कविता,
स स्पर्शी, अनुभवातून सुचलेली
आणि मी शब्दबद्ध केलेली
तरीही का कुणास ठाऊक कशी
जीवनाशी एकरूप झालेली,
मला वाटतं...
जीवनही आहे सुंदर कविता
परमेश्वरानं लिहिलेली
प्रत्येक एक ओळीत जिच्या
दडलंय गुपित जगण्याच,
जुळायला हवेत यमक मनामनाचे
निर्मेल तेव्हाच खरी कविता,
जीवनातल्या अनुभवण्यासारख्या अनुभवाची
जणू काव्यरूपी शिदोरीच,
तरीही नको अपेक्षा प्रसिद्धीची
माझ्या जगण्यात, माझ्यात शब्दात
असो कशीही तरीही माझीच,
आवडो कुणाला किंवा नावडो
प्रिय मला 'माझी कविता'.
