STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

4  

Vasudha Naik

Inspirational Others

माझी आई

माझी आई

1 min
204

आई तुझी मला । येता आठवण ।।

प्रेमाचे ते क्षण । सासरचे ।।


माझे लाड सदा । दोघे करायचे ।।

माया लावायचे । निरंतर ।।


लाडात वाढले । शाळाही शिकले ।।

नाव कमावले । जीवनात ।।


मायेचा सागर । ममतेची मूर्ती ।।

आहे तुझी किर्ती । सारीकडे ।।


आई माझी पाहे । मुलीचा संसार ।।

प्रेम हो अपार । माझ्यावरी ।।


जन्म हा मिळाला । पावन मी झाले ।।

हर्षात न्हाले । तुझ्यामुळे ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational