STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

माझी आई

माझी आई

1 min
176

जगातली माझी पहिली गुरु 

शिकवी ज्ञान माझी आई,

हातात धरून माझे बोट 

चालवण्यास शिकवे माझी माई.


शब्दांचा खेळ न कळे मला जेव्हा 

आई माझी शिकवी बोलण्यास,

संस्काराची देई मला शिदोरी 

सद्गुणाने माझे चरित्र वाढण्यास. 


देई परिश्रमाचे धडे मजला 

कष्टाचे महत्त्व समजावून, 

न रहावे कोणावर अवलंबून 

सांगे स्वतः घडण्यास बजावून. 


येता मजवर अडचणी 

पटकन आई ती सोडवी,

होऊन माझी अंगरक्षक 

निराशेच्या धक्क्यातून वाचवी. 


आई माझी कुटुंबाची सावली 

तुझ्यामुळेच आई घर गुंफुन राही, 

आम्ही सगळे तुझ्या मायेचे मनी 

तुझ्यासाठीच आई शब्द सुमने वाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational