STORYMIRROR

Meera Bahadure

Inspirational

3  

Meera Bahadure

Inspirational

माझी आई

माझी आई

1 min
168

काळोख्या आंधारातही

अनवाणी चालायला शिकलो होतो

चांदण्यांची निश्वार्थ साथ होती

माझी आई माझ्या सोबत होती 


बाईच्या हातात हात धरून

आईचा आ तर शिकलो

आ पासूनचा आत्मसन्मान 

शिकवायला आई सोबत होती


जिवणाच्या वाटेवर अडखळलो

पडलो, धडपडलो विश्वास गमावलो

संपल सगळ वाटत असताना 

अचानक आईची सावली दिसली

आ पासूनचा आत्मविश्वास मिळवायला

माझी आई माझ्या सोबत होती.


समाजानेही खुप छळ केला

बदणामीचा तर कहरच केला

पण पाठीवरती विश्वासाची थाप होती

माझी आई माझ्या सोबत होती


नादान रोपट्याचा वॄक्ष झालो

माणूसतर झालो माणुसकी शिकलो

अफाट संकटांवर मात करत गेलो

खंबीरपणे उभा रहात होतो

माझ्यासाठी जळणारी दिव्याची वात होती 

हे जग सुखाने पाहू शकलो

कारण माझी आई माझ्या सोबत होती



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational