माझे हात
माझे हात
माझे हात कशाला? कशाला हो कशाला?
एकमेकांना मदत करायला
लिहायला आणि वाचायला
स्वच्छता सारी करायला....!!
माझे हात कशाला? कशाला हो कशाला?
नाचायला आणि सजायला
आईच्या कामात मदत करायला
आंधळ्यास आधार द्यायला...!!
माझे हात कशाला? कशाला हो कशाला?
सुंदर पेंटिंग काढायला
सुरेख रांगोळी काढायला
प्रत्येक काम करायला.......!!
माझे हात कशाला? कशाला हो कशाला?
नमस्कार मित्रांना करायला
सुंदर हस्ताक्षर काढायला
गरिबाला दान द्यायला......!!
माझे हात कशाला? कशाला हो कशाला?
छान छान पदार्थ करायला
खूप खूप झाडे लावायला
त्याला पाणी घालायला......!!
