माझे घर...
माझे घर...
*************************
प्रेमाचे नाते घट्ट इतके
माझे घर माझा परिवार,
जगण्यास देते अतूट बळ
स्वप्नांना देऊनिया आकार...
राग, द्वेष, भांडण-तंटा इथेच
निर्माण मनामनांत होई,
क्षणभर पुन्हा विसरून सारे
स्वच्छ नात्याचा आरसा होई..
सुख-दुःखाची घडी येता
हात प्रेमाने सदा भरलेला,
प्रसंगात हरेक विश्वासाचा
मौक्तीक सहज लाभलेला...
जिव्हाळ्याची गाणी ओठी
माया,ममतेचा झरा वाहतो,
माझं घर, माझा परिवार
जगण्यास नवसंजीवनी देतो..
ताण-तणाव बाजूस सारून
रडगाणे आपण विसरून जाऊ,
हक्काचे हे मंदिर जीवापाड
हसण्या-खिदळण्याने सजवू..
जीवनाच्या प्रवासात एकच
आनंददायी स्थान लाभावे,
प्रेमाच्या शृंगाराचा साज त्यास
जन्मोजन्मी सदा फुलावे...
🙏🙏🙏🌷🌷🙏🙏🙏
