Kshitija Bapat

Tragedy

5.0  

Kshitija Bapat

Tragedy

माझे बालपण

माझे बालपण

1 min
351


बालपणीच पोटासाठी

सोडली शाळा पाटी

हसण्याच्या बागडण्याचा

वयात उचलली ओझी


पोती उचलताना आठवली

आजारी आई बहीण भुकेली

त्यासाठीच बालपणी केली

मोल मजुरी


राहिलो अनपढ आनाडी

कधी पुसली मोटर गाडी

हॉटेलमध्ये धुतली भांडी

कधी पुसली फरशी


खोखो कबड्डी लंगडी कंचे क्रिकेट

लपाछपी पतंग उडवणे

हे बालपणीचे सर्व खेळ

यांच्याशी माझा जमला नाही मेळ


बाल दिन साजरा करतात

सर्व लहान बालके

मी मात्र दुकानात

मारत होतो फडके


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy