STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Romance Tragedy

माझे अबोल गाणे

माझे अबोल गाणे

1 min
248

हे शब्द हाय माझे, झाले कसे विराणे

देऊ कसे तुला मी, माझे अबोल गाणे


व्हावे असेच काही, एकांत हा सरावा

शिशिरात या तनाला, ना सह्य हा दुरावा

घेऊन ये वसंता, काही नवे बहाणे

देऊ कसे तुला मी, माझे अबोल गाणे


तो कृष्ण जीवनी ना, राधेस त्या मिळाला

रांझेस शोधताना, तो हीरही जळाला

या काचखेळण्यांचे, आम्ही तरी दिवाणे

देऊ कसे तुला मी, माझे अबोल गाणे


बेधुंद रात्र सरता , उरलेच काय हाती

डोळ्यांत आसवांनी, केली उगाच दाटी

स्पर्शात बोल आता, झाले पुरे पहाणे

देऊ कसे तुला मी, माझे अबोल गाणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance