माझा शिवबा
माझा शिवबा
नियतीला नमवणारा
गनिमांना झुकवणारा ;
काळावरही विजय मिळवणारा
असा माझा शिवबा .
प्रजेला जपणारा
रणांगणी मुरुड लढणारा
स्वराज्य स्थापनारा
असा माझा शिवबा .
समानतेचे बीज पेरणारा
आया-बहिणींना जपणारा ;
अन्यायाविरुद्ध पेटणारा
असा माझा शिवबा.
वायू वेगाने धावणारा
दुश्मनांची झोप उडवणारा ;
संस्कृतीचे रक्षण करणारा
असा माझा शिवबा.
कायम तत्वनिष्ठ असलेला
मानवतेचे सूत्र जोपासणारा ;
जाती-धर्मभेद न मानणारा
असा माझा शिवबा .
स्वतंत्र भगवा फडकवणारा
शिवराजमुद्रेचे पालन करणारा;
शिवशाहीने राज्य करणारा
असा माझा शिवबा .
इतिहास समृद्ध करणारा
प्रत्येकाच्या हृदयी राहणारा ;
जीवनसंघर्षाची प्रेरणा देणारा
असा माझा शिवबा .
