STORYMIRROR

Saroj Gajare

Fantasy Others

3  

Saroj Gajare

Fantasy Others

माझा गाव

माझा गाव

1 min
718


डोंगराच्या अल्याड, नदीच्या पल्याड

गाव माझा वसलेला, टेकडीच्या कुशीत।।धृ।।


टुमदार घरांवर, दुधी कारल्याचे वेल

प्राजक्ताचा सडा करी, अंगणात दरवळ

प्राचीवरचा अरुण, गुलालाची उधळण

दुर रानी ऐकू येते, नदीनाल्यांची खळखळ ।।१।।


माझ्या गावचा वारा गातो,राग तो गंधार

इवलाली तृणफुलें, करती धरित्रीचा शृंगार

भल्या पहाटे गजबज, गाई गुरांचा हंबर

भ्रमरांचे चाले गुंजन, गंधाळल्या फुलांवर।।२।।


पाणवठ्यावर ऐकू येते, कंकणांची किणकिण

शेता जाती जोडपे, जणू लक्ष्मी नारायण

मेघामधून होता ते, पावसाचं आगमन

रानी वनी केकारव,न मयूरांच नर्तन।।३।।


माझ्या या गावात, डोलणारी हिरवी शेतं

बळीचा आगोट येता, पोटरीला पिकं

रामा शिवाच्या घरात, सती सावित्रीचा वास

मिळे मायेची पाखर, न गुण्या गोविंदाचा घास।।४।।


ओल्या चाऱ्यास रंगवी, रानफुलांची पखरण

रानोमाळ भिरभिरती, वर्षाराणीची विमानं

वसुधैवकुटुंबकं नांदती, गावी सारे जन

सजीव चित्रचं जणू, वारली रेखाटन।।५।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy