STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

माझा गाव

माझा गाव

1 min
186

कृष्णाकाठी माझा गाव

निसर्गाने नटलेला!!

फुलापानांनी हिरवळीने

डोंगरदऱ्यांनी सजलेला!!


संथ वाहते कृष्णामाई

संथ तीचे पाणी!!

चल जाऊया आपण दोघे

कृष्णाकाठी राजाराणी!!


पशुपती चे मंदिर तिथे

 मठ पण जंगली महाराजांचा!! 

चौंडेश्वरी देवी ला करू नमन

 गजर करू मारुती आणि महादेवाचा!!


पिके डोलती रानोरानी

चोहीकडे हिरवेगार!!

पाहून शेताचे सौंदर्य

आनंदाला अंत ना पार!!


गोड असतात माणसे सारी

माझ्या गावाकडची!!

सरळ साधी ,भोळी ,लोके

निर्मळ अंतकरणाची!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational