STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

माझा गांव

माझा गांव

1 min
940


माझा गाव शोधतांना

डोईवर सूर्य आला

चिरडून सावल्यांचा

पावलात अंत झाला...


त्या उन्हाच्या झळांनी

लागली भूक वेडी

मावळलेल्या दिसातील

भेटली झोपडी चंद्रमौळी...


सांडले हळूच अश्रूं

मुक्या त्या तृणांवर

मित्र आठवले जुने

मिठ चोळनारे व्रणांवर...


आवाज कुठूनी आला

उगाच फोडणीचा

तेल उपवून गेले

भाजी तिखटात घोळणीचा...


वेशीवर गंध माझ्या

अजूनही तोच आला

क्षणात गळून सारा

माझा अभिमान गेला...


शिकुनी अक्षरांना

माझाचं मी घात केला

काचात ठेवूनी सूर्य

अंधार दाट केला...


उंच कोट साहेबांचा

घालूनी फक्त आलो

एकटा चालतांनी

रस्ता भुलून गेलो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational