माझा बाबा
माझा बाबा
माझा बाबा आहे हुशार
तो करतो माझी काळजी फार
माझा बाबा देतो सर्वांना आदर
मी माझ्या बाबाची परी
माझा बाबा आहे घरची कष्टची दोरी
माझा बाबा करतो माझा लाड काहीही झाले तरी
तुझे नाव आहे विकास
तू केला आहेस माझा विकास
बाबा तू आहेस माझा श्वास
तुझे बोट पकडून शिकले मी चालायला
तू असताना नाही त्रास होत घरातल्या कोणाला
बाबा तू कारण आहेस माझ्या हसण्याला
ओरडतोस मला तू चांगल्यासाठी
तू आहेस सुपर हिरो माझ्यासाठी
बाबा thank you माझ्याकडून तुझ्यासाठी
कृतिका शिंदे
