सुखाची छाया
सुखाची छाया
निसर्गाची साथ आहे
हातात तुझा हात आहे
चंद्रावर कोरले तुझे नाव आहे
नक्षत्राच्या प्रकाशात तुझे प्रतिबिंब आहे
हातात तुझ्या बळ आहे
तुझ्या मुळे आज हे जग आहे
तू आमची लक्ष्मी, सरस्वती , हिरकणी आहे
अशी लाडकी आणि गोड आमची आई आहे
माझ्या आईची माया
जणू सुखाची छाया
तुझा आनंद म्हणजे आमची जाया
तू नाही विसरत आमचा गाया
हिरा म्हणजे आई
आई म्हणजे रखुमाई
वाई मधली माझी आई
आई शिवाय मला करमत नाही
आमच्या डोळ्यातले आश्रु करतात तुला दुःखी
आमच्या आनंदात तू राहते कायम सुखी
तुझे मुख आहे चमकते चंद्रमुखी
नको राहू आई कधी दु:खी
आई तूच माझा श्वास
आई तूच माझा विश्वास
तुझ्या विश्वासाने पूर्ण होते प्रत्येक आस
आई तुझी साथ आहे माझा विश्वास
आई तू अनपूर्ण देवी
आई तू आहेस कवी
आई तू करतेस प्रत्येक गोष्ट नवी
आई तू असल्यावर घरी सुख येई
🔀®️🔱✝️ℹ️🔀⛎
