मागू नको सखे..!
मागू नको सखे..!
मागू नको सखे तू आज पुनवेचा चंद्रमा..!
थांब सरू दे जरा ही अवसेची घोर तमा..!!ध्रु!!
चंद्रा सम फाके तेज जळे दीप तुळशीला..!
सावर तू आज जरा या घोर काळ रात्रीला..!
सोड अबोला साजणी आता सरते ही तमा..!
मागू नको सखे तू आज पुनवेचा चंद्रमा..!!१!!
सांग कसा तो येईल आज मर्यादा तोडूनी..!
न जाईल कधी असा पुन्हा तुजला सोडूनी..!
समजून तू घे आज दैना त्याची प्रिये रमा..!
मागू नको सखे तू आज पुनवेचा चंद्रमा..!!२!!
करतेस का हट्ट अशी घे समजून तू जरा..!
मागतेस काय चंद्र देईन मी त्या भास्करा..!
सोड असा हा रुसवा सखे माझी प्रियतमा..!
मागू नको सखे तू आज पुनवेचा चंद्रमा..!!३!!
संपला अंधार सारा दिनकर आला प्राची..!
पडला उजेड जगी झाली सरती रात्रीची..!
घेई पाहिजे तितुके सारे नभ तुला जमा..!
मागू नको सखे तू आज पुनवेचा चंद्रमा..!!४!!