लव्हस्टोरी
लव्हस्टोरी
ऍरेंज की लव्ह....
आहे अजूनही जो तो कन्फ्यूज
तुझ्या माझ्या लव्ह स्टोरीचे
ठाऊक आहे दोघांनाच गुज
पाहताक्षणीच आवडलो दोघे एकमेकांना
"दोन शब्दांनी" चुकविला काळजाचा ठोका
तुझ्यानंतरही पाहिल्या कित्येक जणी
भरली नाही मात्र कुणीच तितकी मनी
आजही आहे जपलेला फोटो तू दिलेला
काळजीपूर्वक वरच्या खिशात ठेवलेला
"थोडे खट्टे थोडे मिठे" वेचले कित्येक क्षण
जमेल तसे घरच्यांचे जिंकून घेतलेस मन
आजही प्रश्न पडतो... "काय पाहिलंस माझ्यात?"
लोकांना कोडे पडते... "गुपित कोणते सौख्यात?"
वेल चढला उमलले फुल... आणि काय हवं
माझ्या हृदयावर गारुड फक्त तुझंच असावं
फक्त तुझंच असावं